खरचं आता ऒर्कुटवर, पुर्वीची मजा राहिली नाही.

खरचं आता ऒर्कुटवर, पुर्वीची मजा राहिली नाही.

फ्रॆंडस, फॆन्स वाढले तरी, आधीची, धम्माल नाही ।

पूर्वी सगळ्यांच्या, स्क्रॆपबुकचे दरवाजे उघडे होते,

कुणीही या, वाचून जा, खुल्लमखुला सारे होते ।

ओळखीचे ना पाळखीचे, गल्लीचे ना गावचे, तरी..

आओ, जाओ घर तुम्हारा, आगळेच ते स्वागत होते।

कुणाचे प्रेम, कुणाचा रुसवा, कुणाचा राग, कुणाचा फतवा,

उघडे पुस्तक भावनांचे, वाचणे केवढे रोचक होते ।

आता सगळचं बदललयं, अनोळखींना प्रवेश नाही,

दारच बंद असल्यावर, डोकवायचा प्रश्नच नाही ।

मित्रांची दारे उघडी, पण त्यात संवाद नाही,

कसल्या कसल्या लिन्क्स, वाचण्यात काही मजा नाही ।

गप्पा सा-या जीटॊकवर, कुणाला काही कळत नाही,

चालायचचं हे सारं..........! कळतयं, पण वळत नाही ।

ऒर्कुटवरच्या चव्हाट्याची, रंगत आता राहिली नाही,

फ्रेंड्स, फॆन्स, वाढले तरी, आधीची ती धम्माल नाही ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Unknown said…
Agadi khare lihale ahe tumhi ! ....

-- Nikhil ( Orkut chya jagatala ek Puran Purush)

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?