जाग पोरकी येते

स्वप्नात कधीतरी दिसते माझे गाव,
तो नदीकाठ, माझी तशीच सुसाट धाव ।
ते वळण ओलांडूनी मी, माहेराला जाते,
दाराची चौकट रिक्त, दुःखाने घुसमट होते ।
’आई, आई,’ करते, आक्रंदते, पुढे पुढे जाते,
स्वप्नातल्या स्वप्नी आई लगबग दारी येते ।
’अगं बाई, अवचित आलीस! ’ आनंदून म्हणते,
पायावर पाणी देते, घास उतरवूनी टाकते ।
आईच्या कुशीत शिरूनी लटकेच मी चिडते,
’होतीस कुठे गं आई?’ रडता रडता पुसते ।
’हे कसले लपणे? कळत नाही का तुला,
थट्टा ही कसली, जीव किती व्याकुळला ।’
मुसमुसते, स्फुंदते, आईस घट्ट बिलगते,
रडता रडता कधीतरी, जाग पोरकी येते ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Shailaja.taai,

मुसमुसते, स्फुंदते, आईस घट्ट बिलगते,
रडता रडता कधीतरी, जाग पोरकी येते ।

......एकदम अप्रतिम कविता आहे.

..नेहमीप्रमाणेच... वाचून दिल खुश झाला....
Unknown said…
शैलजाताई,

अतिशय सुंदर भावपूर्ण कविता............ जाग पोरकी येते....
Unknown said…
पायावर पाणी देते, घास उतरवूनी टाकते ।
आईच्या कुशीत शिरूनी लटकेच मी चिडते,

he fakt aaich karu shakate....

मुसमुसते, स्फुंदते, आईस घट्ट बिलगते,
रडता रडता कधीतरी, जाग पोरकी येते ।

so sad....
Maherchi khoop athavan ali shailaja tai!
Maherchi khoop athavan ali shailaja tai!
Aaichi aathavan aali kavita vachatana..... khup bhavpurn kavita....

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?