सावळ्या दर्शन दे रे..

सावळ्या, दर्शन दे रे, सावळ्या दर्शन दे रे,
व्याकुळला जीव हा रे, सावळ्या दर्शन दे रे ।
तिष्ठले मी दारापाशी, जाणुनी घे, हे हृषिकेशी,
आर्त हाक ऐक ना रे, सावळ्या, दर्शन दे रे ।
कोलाहल हा माणसांचा, घाबरा रे जीव माझा,
ओळखीचा फक्त तू रे, सावळ्या दर्शन दे रे ।
विसरून गेले मी घर दारा, सोडून आले सर्व पसारा,
नाती गोती, सगे सोयरे, सावळ्या दर्शन दे रे ।
क्षणक्षण आता युगयुग वाटे, डोळ्यामध्ये पाणी दाटे,
प्राण आले कंठाशी रे, सावळ्या, दर्शन दे रे ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Unknown said…
ही कविता ऐकायला खूप छान वाटेल.... आर्त भाव आहेत...
Shailaja.taai...

कोलाहल हा माणसांचा, घाबरा रे जीव माझा,
ओळखीचा फक्त तू रे, सावळ्या दर्शन दे रे ।

..khup sundar oli...

..aartata jaanavate..

...chhaan kavita...
Unknown said…
Surekha bhawana .....Artata ahe ....really nice one .Keep it up dear ....All the best !

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?