द्वादशपंजरिका स्तोत्राचा मराठी अनुवाद

श्रीमद आदि शंकराचार्य यांच्या द्वादशपंजरिका स्तोत्राचा मराठी अनुवाद

सोड तू वेड्या हाव धनाची, सदबुध्दीने जिंकी मनासी,

मिळते जे तुज, निजकर्माने, हो आनंदी त्या वित्ताने ।१।

पैसा हे कलहाचे कारण, कधी जराही सुख ना जाण,

हिश्श्यासाठी मुले भिवविती, सर्वत्रच रे ही जनरीती ।२।

कसली पत्नी, कसला पुत्र, संसारच हा अति विचित्र,

तू कोणाचा, कोठुनी आला, विचार बंधू, तुझ्या मनाला ।३।

नको धनजनयौवन गर्व, क्षणात काळ नेईल सर्व,

मायेचा रे, सारा वेष, जाणून घे, ब्रह्मपदी प्रवेश ।४।

काम क्रोध अन लोभ नी मोह, सोडूनी आत्मस्वरूपा जाण,

आत्मज्ञान जे ना जाणीती, मूर्ख असे ते, नरक भोगीती ।५।

मंदीरी वा तरूतळी राहणे, भू शय्या वल्कलं घालणे,

विषयसंग्रहा भोगा त्यागी, सुखेच भोगी, तो बैरागी ।६।

शत्रु मित्र अन बंधु पुत्र, नको उगा तो तंटा मैत्र,

सर्वांमध्ये कर समचित्त,विष्णुपद जर हवे त्वरीत ।७।

तू मी प्रत्येकातच विष्णु, चिडसि उगा का सर्वसहिष्णु,

सर्वांमध्ये पहा स्वतःला, दे टाकूनी त्या भेदाला ।८।

प्राणायाम,प्रत्याहार, नित्यानित्यविवेक विचार,

जपजाप्य अन नामस्मरण, सतत ठेव तू, ’त्या’ चे ध्यान ।९।

कमलदली जलथेंब क्षणभरी, जीवन अपुले,

क्षणभंगुरी,रोगे,गर्वे, सारे ग्रस्त, शोकामध्ये सारे त्रस्त ।१०।

भलती चिंता करीसी तू का, अरे चंचला, गुरु नाही का?

स्वतःस सोपवी, त्यांच्या हाती, अधिकाराने, तत्व शिकविती । ११।

गुरुच्या पदकमळाची भक्ती, संसारातून लगेच मुक्ती,

मन इंद्रियाचा निग्रह तू कर, पाहशील मग, हृदयी ईश्वर। १२।

द्वादशपंजरिका ह्या ऐशा, शिष्यांना, उपदेश सांगती,

विवेक नाही ज्याच्या चित्ती, नरकयातना, ते भोगिती । १३।

सत्संगातून निःसंगत्व, निःसंगातून निर्मोहीत्व,

निर्मोहातून निश्चलचित्त, निश्चलचित्ते जीवनमुक्त ।१४।

योगामध्ये, भोगामध्ये, लोकांमध्ये वा एकांती,

ब्रह्मचिंतने चित्त रंगले, आनंदच आनंद किती ।१५।

अनुवाद: सौ. शैलजा शेवडे

Comments

SURESH PITRE said…
charpat panjarika peksha dwadash
panjarika chhan watle , karan chalit
barobar mhanta yete, charpat panjarikache suruwatiche shlok jraa
chalit watle nahit, kinwa kadachit mlaa ti chal kalali nasel ka ?
aapla email id milu shakto kaa ?
mla ek arati bhashantarit karun havi aahe aani narmada ashtak ajun marathi kawyanuwad koni kelela nahi mi nuktich narmada parikrama karun aalo aahe , hinid anuwad sanjiv salil hyani kela aahe pan to titka changla nahi watla, aani ekun 4 sanskrut narmada ashtake aahet pan tyatil shankaracharyanche aani manipraval hech chhan watate - suresh.pitre@gmail.com,
SURESH PITRE said…
kindly send your email id - I want to translate our kuladaivata's sanskrit arati to marathi
suresh.pitre@gmail.com
shailajashevade said…
मनापासून धन्यवाद.....!

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?