नाईलाज....!

पावसा आणू नको रे, कोवळ्या त्या आठवांना,
तुंबलेल्या अंगणाचे, काम आधी....! नाईलाज.....।
तो इशारा पावलांना, चिंब होऊन नाचण्याचा...,
पाय-या शेवाळलेल्या घासते मी..! नाईलाज.....।
पावसा बरसू नको रे, थेंब तुझे, हे नशीले,
डागडूजी रे घराची, आज करते..... नाईलाज......।
पावसा देतो कशाला, अमृताचे हे झरे, रे,
माजलेल्या या तणा, मी काढते रे.... नाईलाज..।
मेघदूता रे कळाला, आणला संदेश, तू जो,
फेकला तो, वाळलेला काळ माझा.... नाईलाज...।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Shailaja.taai,

पावसा देतो कशाला, अमृताचे हे झरे, रे,
माजलेल्या या तणा, मी काढते रे.... नाईलाज..।
..waah ! khup sundar kavita

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?