ऒर्कुट प्रेमकथा!
ऒर्कुट प्रेमकथा!
सकाळ झाली...बंडू उठला...डोळे चोळत ऒनलाईन आला.
आज ’फूल’ बनवायला, नवीन फूल दिसतयं का...,
शोध घेऊ लागला.........मिळालंसुध्दा.....!
आनंदाने लिहू लागला, ’गुड मॊर्निंग..!मस्त स्नॆप आहे तुझा!
प्रोफाईल इंटरेस्टिंग आहे.मैत्री करायला आवडेल?’
नवखं फूल मोहरून गेलं! बंडूच्या फ्रेंडलिस्टमध्ये जावून बसलं!
कुठून कुठून कॊपी पेस्ट केलेल्या कविता, बंडू पाठवत सुटला,
फुल खुषीने वाचत बसलं...बंडूचा धीर चेपला.
फुलाला लिहिलं, 'आजकाल ऒरकुटचा चव्हाटा झालायं!
जी टॊक करु या?' फुल उगाच लाजलं..
पुढचं बोलणं जी टॊकवर झालं!
बंडुला ऒनलाईन बघून, नकळत, खुदकन मनात हसू लागलं..!
बंडू अजून पुढे सरकला, लोडशेडिंगचे कारण सांगत,
सेलफोन नंबर विचारू लागला.फुलाच्या मनात काय आलं,
एकवार बंडूचं स्क्रॆपबुक बघावं वाटलं..
हे देवा! टीना शिना मीना लीना.....बंडूची फ्रेंडलिस्ट, संपता संपेना!
प्रत्येकीशी तेच ते गोड बोलणं.....’फक्त तुझ्यासाठी ... ’
करत रेड रोझ पाठवणे,
फूल एकदम भानावर आलं, ऒर्कुट अकाऊंट क्लोज करून गेलं.
’...मेल आय डी नंबर... एवढीच माझी ओळख का?’
स्वतःला परत परत प्रश्न करू लागलं....पण हाय रे..!
ऒर्कुटचं व्यसन असं कसं लागलं?
दुस-या नावानं फूल परत ओर्कुटवर आलं...
सकाळी सकाळी बंडून हेरलं..उत्साहानं लिहिलं..,
’गुड मोर्निंग..... मस्त स्नॆप आहे तुझा,
प्रोफाईल इंटरेस्टींग आहे.
माझ्याशी मैत्री करायला आवडेल?...........
..................................................................’
(सौ.शैलजा शेवडे)

Comments