गाव मागे राहिला...!
पोचण्याला गावी ज्या मी जन्म माझा वाहिला,
थांबले नाही तिथे मी, गाव मागे राहिला...........!
हाय ती बेचैनी अन ते, रात्र रात्र जागणे,
मूक आसवांनी मग ते, चांदण्यांशी बोलणे,
पहाटवा-याचे कधी, अन पापण्यांना झाकणे,
स्वप्नात मी जो पाहिला, तो गाव मागे राहिला ।
किती जिद्द होती मनी, त्या तिथेच होते जायचे,
वाट्टेल ते सोसायचे, पण ना कधी थांबायचे,
ऊनपाऊस खेळतांना, इंद्रधनु हाती झुला,
आकाश होते वाकले, तो गाव मागे राहिला ।
का नाही थांबले जिथे मी, मुश्किलीने पोचले,
बोलावते का क्षितिज दूरचे, की मनाचे चोचले?
धावायचे, धावायचे, कशी मनाची ही त-हा ?
क्षणभरी विश्राम झाला, अन गाव मागे राहिला ।
(सौ.शैलजा शेवडे)

Comments
atyant sanyant shabd pan titkech prabhavi rachanaa
आकाश होते वाकले, तो गाव मागे राहिला ।
..waah ! kiti sundar lihita ho taai !...khup ch chhaan