मन गोकुळ हे
मन गोकुळ हे, व्याकुळ गिरिधर,
.
घुमेल कधी रे बासरीचा स्वर?
.
भाव मनीचे, होतील, गोपी,
.
रस आनंद तू, हे मुरलीधर ।
.
.
.दिसेल कधी तव, सुमुख सुंदर ,
.
.रेखियले मी चित्र निरंतर,
.
उत्कंठीत ही उमटे थरथर ,
.
भाव मधुर हा, व्यापे अंतर |
.
.
.
मधुर, मधुर तव लीला मोहन,
.
मनात अविरत त्यांचे चिंतन,
.
कोण असे मी, काळ कोणता?
..
युगायुगांचे, हे आकर्षण |
.
.
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
Comments