का कसे अचानक, आभाळ क्रंदते,
काळजात कळ उठते,, सैरभैरते ।
.
हळवे चितारते, खोडून टाकते,
अश्रुंचे संजीवक, रान माजते ।
.
वैरीण ती वीज कशी, नाच नाचते,
नकळतच मीही कशी, चाल बदलते ।
.
थेंब थेंब पावसात, गीत पेरते,
दुःख कुण्या राणीचे, मुक्त माळते ।
.
का पुन्हा रिंगणात, घुमता हासते,
बंडाचे झेंडे का, हळुच लपविते ।
.
.
(सौ. शैलजा शेवडे)
Comments