घोंघावत वादळ येते

घोंघावत वादळ येते,
पाचोळा गोल घुमविते,
सैरभैर, मीही नकळत
घंटेचा नाद पकडते ।
.
ते शब्द गाभा-यातील,
ती गंध वेढिली मूर्ती,
आभास पुसट आईचा,
ओंजळी फुलांच्या भरती ।
.
त्या स्मृती कोणजन्माच्या,
काठावर तरंग नेते,
द्वैताच्या रेषा पुसल्या,
आश्वासक कोणी हसते ।
.
भरकटले पाऊल वळते,
वा-याची दहशत जाते,
तो कळसावरचा झेंडा,
भक्तीची गंगा येते ।
.
.
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?