नाठाळ पावले ही....

नाठाळ पावले ही, आली तुझ्याचपाशी,
जाणे कुठे न का ही, आली तुझ्याचपाशी ।
गीतात अक्षरांना, कासाविशी कशी ही,
घेऊन आर्तता ही, आली तुझ्याचपाशी ।
का पारवा घुमे तो, कोणास साद घाली,
फिर्याद कोणती ही, आली तुझ्याचपाशी ।
ओसाड माळरानी, हे झाड बापुडेसे,
पाने उडून तीही, आली तुझ्याचपाशी ।
बोलू नकोस काही, या कोवळ्या क्षणाला,
गंधाळली निशा ही, आली तुझ्याचपाशी ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

वा ताई,

बोलू नकोस काही, या कोवळ्या क्षणाला,
गंधाळली निशा ही, आली तुझ्याचपाशी ।

..किती सुंदर गझल लिहिलीत तुम्ही !
Unknown said…
ओसाड माळरानी, हे झाड बापुडेसे,
पाने उडून तीही, आली तुझ्याचपाशी ।

बोलू नकोस काही, या कोवळ्या क्षणाला,
गंधाळली निशा ही, आली तुझ्याचपाशी ।

ahaha... kay sundar lihilay
ओसाड माळरानी, हे झाड बापुडेसे,
पाने उडून तीही, आली तुझ्याचपाशी ।
बोलू नकोस काही, या कोवळ्या क्षणाला,
गंधाळली निशा ही, आली तुझ्याचपाशी ।

Khup chhan kalpanaa mandlit taai tumhi..manapasun aavadli..tasha tumchyaa sagalyach kavita kahi tari chhan sangun jatat ...

shrikant patilkaka

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?