देवळाच्या दारी

टेकावे जरासे, देवळाच्या दारी,
शिणला हा भारी, जीव वाटे ।

शब्द बापुडे हे, काथ्याकुट किती,
काळ दावी भीती, कोठे जावे?

हिणवती सारी, म्हणती अडाणी,
वाळवंटी पाणी, कोण देई ?

फिटले फिटले, भ्रम सारे सारे,
जोशातले नारे, आता नाही ।

विटले हे मन, पुरे वणवण,
दावी रे चरण, पांडुरंगा ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?