का बोलले अशी मी?

मी एकटीच येथे, माझ्या जगात आहे.’
का बोलले अशी मी, घायाळ रात आहे ।

आले चुकून तोंडी, काहीतरी चुकीचे,
आता अबोल त्रागा, कोंडी मनात आहे ।

वैताग तो क्षणाचा, का शापवून गेला,
ते बोलणे मनाला, जाळीत जात आहे ।

आजन्म साथ त्याची, खात्री मला तरीही,
बेताल वागण्याची, शिक्षा अफाट आहे ।

मागायची कधीची, माफी मला तुझी रे,
तू जाणशील का रे, वेडी उन्हात आहे ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?