जुळवीत गझला राहिले..

शोधीत बसले काफिये, जुळवीत गझला राहिले,
सोडून गेले जे ऋतू, खिजवीत मजला राहिले ।

आक्रोश चाले भोवती, मदतीस कोणी बोलवी,
काव्यातले ते मेघ जे , भिजवीत मजला राहिले ।

मोडीत कोणी चालले, घरट्यास त्या शेजारच्या,
गोषात माझे दुःख ते, घुमवीत मजला राहिले ।

मूर्तीस कोणी फोडिले, जळले कसे ते रानही,
ओवीत काही गेय जे, भुलवीत मजला राहिले ।

फाटून नाती चालली, गणगोत सरले पांगले,
ते चाहत्यांचे भास जे, खुणवीत मजला राहिले ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?