स्मरतोस का कधी तू ?

चुपचाप आसवांना, टिपतोस का कधी तू,
नादान त्या व्रणांना, स्मरतोस का कधी तू ?

अस्तास सूर्य जाता, गंधाळली कहाणी,
त्या कोवळ्या खुणांना, स्मरतोस का कधी तू ।

ते रान सांजओले, व्याकूळले किनारे,
त्या गूढशा तणांना, स्मरतोस का कधी तू ।

पाण्यात कोरलेली, नक्षी तुझ्याच नावे,
बेभानल्या क्षणांना, स्मरतोस का कधी तू?

वाटा दुरावलेल्या, काळास कोण रोखे,
अंधार आधणांना, स्मरतोस का कधी तू?

आहेत वादळे ही, डोहात संयमाच्या,
ओढाळ कारणांना, स्मरतोस का कधी तू ?

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?