आहेच कोण येथे?
आहेच कोण येथे, झाडावयास माळे,
या मोकळ्या घरांचे, खोलावयास टाळे ।
आभाळ हे विरक्त, झाडास दुःख नाही,
कोणीच ना रिकामा, पाहावयास चाळे ।
पक्षी उडून गेले, नाही थरार झाला,
आलाच ना शिकारी, फेकावयास जाळे ।
तो सूर्य आग ओकी, कोणास काय त्याचे,
ना मेघ कोणतेही, झाकावयास आले ।
ही कोठली उदासी, ना खंत खेद ही ना,
नाराज या सतारी, छेडावयास झाले ।
(सौ. शैलजा शेवडे)
या मोकळ्या घरांचे, खोलावयास टाळे ।
आभाळ हे विरक्त, झाडास दुःख नाही,
कोणीच ना रिकामा, पाहावयास चाळे ।
पक्षी उडून गेले, नाही थरार झाला,
आलाच ना शिकारी, फेकावयास जाळे ।
तो सूर्य आग ओकी, कोणास काय त्याचे,
ना मेघ कोणतेही, झाकावयास आले ।
ही कोठली उदासी, ना खंत खेद ही ना,
नाराज या सतारी, छेडावयास झाले ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments