टिपतोस का कधी तू?
चुपचाप आसवांना, टिपतोस का कधी तू,
नादान त्या व्रणांना, स्मरतोस का कधी तू ?
अस्तास सूर्य जाता, गंधाळली कहाणी,
त्या कोवळ्या खुणांना, पुसतोस का कधी तू ?
ते रान सांजओले, व्याकूळले किनारे,
त्या गूढशा तणांना, धरतोस का कधी तू ?
पाण्यात कोरलेली, नक्षी तुझ्याच नावे,
बेभानल्या क्षणांना, भरतोस का कधी तू ?
वाटा दुरावलेल्या, काळास कोण रोखे,
अंधार आधणांना, हरतोस का कधी तू?
आहेत वादळे ही, डोहात संयमाच्या,
ओढाळ कारणांना, हसतोस का कधी तू ?
(सौ. शैलजा शेवडे)
नादान त्या व्रणांना, स्मरतोस का कधी तू ?
अस्तास सूर्य जाता, गंधाळली कहाणी,
त्या कोवळ्या खुणांना, पुसतोस का कधी तू ?
ते रान सांजओले, व्याकूळले किनारे,
त्या गूढशा तणांना, धरतोस का कधी तू ?
पाण्यात कोरलेली, नक्षी तुझ्याच नावे,
बेभानल्या क्षणांना, भरतोस का कधी तू ?
वाटा दुरावलेल्या, काळास कोण रोखे,
अंधार आधणांना, हरतोस का कधी तू?
आहेत वादळे ही, डोहात संयमाच्या,
ओढाळ कारणांना, हसतोस का कधी तू ?
(सौ. शैलजा शेवडे)
Comments