भालावरील रेषा...

वाचू शके कुणी का, भालावरील रेषा?
फांदीवरील पक्षी, जाईल कोण देशा?

पिंजून सर्व ग्रंथा, काठावरीच ज्ञानी,
वेडा कुणी अडाणी, लंघून जाय रेषा ।

त्या लागतात ठेचा, पायास डोळसाच्या,
अंधास हात देई, बदलून कोण वेषा ?

कोणी मुजोर चाले, गुर्मीत वैभवाच्या,
सत्शील दीनवाणा, साही उगाच द्वेषा ।

दाण्यावरी असे ज्या, खाण्यास नाव ज्याचे,
खेचून दैव नेई, त्या नेमक्या प्रदेशा ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?