अमरत्व शाप का रे?

प्रीतीस आपुल्या या, अमरत्व शाप का रे,
आनंद तो क्षणाचा, आसू अमाप का रे ।

आक्रंद काळजाचा, कोणा कसा दिसावा,
वा-यावरी विरावा, हा सांग छाप का रे ।

हा न्याय की कुचेष्टा, सांगाल का कुणी ते,
ओढीस अंतरीच्या, म्हणतात पाप का रे ?

कोणी शिरोमणी तो, काढून घेतला हो,
देणे जिणे असे हे, मोठा प्रताप का रे ।

ताटातुटीची शिक्षा, ही कोठली परीक्षा,
प्रेमास जोखण्याचे, हे मोजमाप का रे?

सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?