लाडाची लेक माझी
लाडाची लेक माझी,
माहेराला आली,
नात्यांची चक्क मग
अदलाबदल झाली ।
मी बनले लेक
आणि ती बनली आई,
म्हणाली मला,
’आता जरा विश्रांती घे बाई!’
मी म्हणायचे संवाद,
ती म्हणू लागली,
मी करायचे तिचे लाड,
तर तिच करु लागली ।
माझ्यासाठी महागडी
चॊकलेटस होती आणली,
लग्नाआधी त्याच्यासाठी
किती बोलणी खाल्ली ।
कसली कसली क्रिम्स,
शाम्पू, सौंदर्यप्रसाधने,
आता या वयात,
नटायचे कुणी? मी का तिने?
’चार पदार्थ करुन
खायला तुला घालते.’
मी बोलायचे हे वाक्य,
तर ती का बोलते?
खरचं मला हे
कोडे होते पडले,
माझे का लेकीचे
माहेरपण होते चालले?
चिवचिवत, गेली उडून
परत तिच्या घरी,
का माहेरपण उपभोगून
आले मी सासरी?
(सौ. शैलजा शेवडे)
माहेराला आली,
नात्यांची चक्क मग
अदलाबदल झाली ।
मी बनले लेक
आणि ती बनली आई,
म्हणाली मला,
’आता जरा विश्रांती घे बाई!’
मी म्हणायचे संवाद,
ती म्हणू लागली,
मी करायचे तिचे लाड,
तर तिच करु लागली ।
माझ्यासाठी महागडी
चॊकलेटस होती आणली,
लग्नाआधी त्याच्यासाठी
किती बोलणी खाल्ली ।
कसली कसली क्रिम्स,
शाम्पू, सौंदर्यप्रसाधने,
आता या वयात,
नटायचे कुणी? मी का तिने?
’चार पदार्थ करुन
खायला तुला घालते.’
मी बोलायचे हे वाक्य,
तर ती का बोलते?
खरचं मला हे
कोडे होते पडले,
माझे का लेकीचे
माहेरपण होते चालले?
चिवचिवत, गेली उडून
परत तिच्या घरी,
का माहेरपण उपभोगून
आले मी सासरी?
(सौ. शैलजा शेवडे)
Comments
bapat.anagha@gmail.com
Anagha.