रंगपंचमी

क्षणैक रंगी रंगणे,
क्षणैक ते आनंदणे,
क्षणैक तो जल्लोष,
क्षणैक सुख पाहुणे ।
शाश्वताची ओढ ती,
अशी मनास लागली,
लुटूपुटीत रंगणे,
हौस आता भागली ।
एकदाच रे हरी,
ओती रंग मजवरी,
रंग रंग रंगू दे,अंतरी, निरंतरी ।(सौ. शैलजा शेवडे)

Comments

sonal m m said…
लुटूपुटीत रंगणे,
हौस आता भागली ।
एकदाच रे हरी,
ओती रंग मजवरी,
रंग रंग रंगू दे,अंतरी,निरंतरी...
wah...bhavana manacha vedh ghetat.

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?