निरोप ओले आवरलेले...

रिमझिम रिमझिम पाऊस

पडतो,काळोखाचे डोळे ओले,

मन मग तारु बनून फिरते,

आठवणीच्या प्रवाहातले।

उडून गेली नभी पाखरे,

टपटपणारे झाड वाकले,

उगाच शोधी नाव कागदी,

बनविणारे हात कोवळे ।

अजून थरकते अंगण इथले,

गिरक्या घेती उगा वादळे,

अजून इथल्या धुलीकणांना,

श्वासगंध ते लपेटलेले ।

आठवते ते कपाटातले,

इवले झबले धुपावलेले,

गोविंदाचा पाय नाचतो,

रुणुझुणू रुणुझुणू घुंगुरवाळे ।

काळजाचा तुकडा जातो,

हात गुंफिले गारठलेले,

हंबरणार्‍या नभात होते,

निरोप ओले आवरलेले ।

( कवयित्री: सौ। शैलजा शेवडे )

Comments

sunmitr said…
शैलजा ताई, ही कविता विशेष आवडली. पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एका निराळ्या भाव-विश्वात रमणारी कविता आहे. सुंदर! मला आवडली.

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?