मी मुक्त बेभान गान...
मी मुक्त बेभान गान,
हे सत्य तू जाण,
किनारा धरून वाहण्याची
सक्ती ही कुठली?
घालू नकोस आण, जीव हैराण,
विनविते सख्या रे
आधी म्हण,'सुटली!'
गुंतू नकोस म्हणतोस,
फेकितोस,खुशाल हे जाळे,
गुरफटता ओढतोस,
जवळ घेतोस,कसले हे चाळे?
हासू नकोस आज,
जीव नाराज,त्यात ही लाज,
सांगते पुन्हा मी,
खूण जीवाला पटली,
घालू नकोस आण,
जीव हैराण, विनविते सख्या रे,
आधी म्हण,'सुटली!'
(सौ। शैलजा शेवडे)
हे सत्य तू जाण,
किनारा धरून वाहण्याची
सक्ती ही कुठली?
घालू नकोस आण, जीव हैराण,
विनविते सख्या रे
आधी म्हण,'सुटली!'
गुंतू नकोस म्हणतोस,
फेकितोस,खुशाल हे जाळे,
गुरफटता ओढतोस,
जवळ घेतोस,कसले हे चाळे?
हासू नकोस आज,
जीव नाराज,त्यात ही लाज,
सांगते पुन्हा मी,
खूण जीवाला पटली,
घालू नकोस आण,
जीव हैराण, विनविते सख्या रे,
आधी म्हण,'सुटली!'
(सौ। शैलजा शेवडे)
Comments