एकच खेळ माझ्या मनात,

एकच खेळ माझ्या मनात,

एकच गीत माझ्या गळ्यात,

तळ्यात मळ्यात,तळ्यात मळ्यात,

तळ्यात मळ्यात,तळ्यात मळ्यात ।

प्रेम माझे,तळ्यात

मळ्यात,राग माझा तळ्यात मळ्यात।

श्रध्दा माझी तळ्यात मळ्यात,

बुध्दीवादही तळ्यात मळ्यात,

प्रपंच माझा तळ्यात मळ्यात,

परमार्थही तळ्यात मळ्यात,

कोणी म्हणतं भोंदू मी,

नक्की संधिसाधू मी ।

घड्याळातला लंबक मी,

कधी गणना होते खुळ्यात,

तळ्यात मळ्यात,तळ्यात मळ्यात!

(कवयित्री: सौ।शैलजा शेवडे)

Comments

आवडली कविता छान आहे.
तळ्यात मळ्यात हा आमचा कुंपणावरचा वर्ग आहे.

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?