माझं आईपण....,

प्रपंचाचं माझं लेकरु,
कधीचं माझ्या पायात घुटमळत,
भुकेनं, कळवळून रडतयं....
’बाळा, जरा थांब रे,
आता तू मोठा झालायसं,
मी तुला अध्यात्माची
पोळी खायला देईन,
त्या विचारांची कणीक भिजवतेयं।’
माझं समजावणं...!
पीठाने दोन्ही हात बरबटलेले,
बाळ रडायचं थांबत नाहीयं।
’अग, उचलून घे,त्याला पाज।शांत कर.’
वडिलधारी मंडळी सांगताहेत।
वात्सल्याच्या पान्ह्याने पदर भिजलायं।
पण बरबटलेल्या हातांनी,
उचलू कशी? पाजू कशी?
त्याचं रडणं, पायात घुटमळणं,
मला पीठही भिजवू देत नाहीयं।
काय करू? रडणारं बाळ...,
भांबावलेलं माझं आईपण...!
(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?