जीवना रे का फिरूनी,
घालीतो कोडे असे,
वैराग्याचे वस्त्र माझे,
हे गुलाबी झाले कसे?
पान पान गळून गेले,
ती विरक्ती सांगतांना,
बहरुन आला चाफा कुठूनी,
झाड ते आहे कसे?
खिल्ली उडवली जातसे,
संन्यस्त माझ्या वृत्तीची,
फांदी फांदी सांगेल का,
सत्यता आसक्तीची ?
गूढ ते माझ्याहीकरीता,
हे फुलांचे बहरणे,
जातो म्हणूनी निरोप घेता,
वाट कशी मग परतीची?
अपूर्ण....
(सौ. शैलजा शेवडे)
घालीतो कोडे असे,
वैराग्याचे वस्त्र माझे,
हे गुलाबी झाले कसे?
पान पान गळून गेले,
ती विरक्ती सांगतांना,
बहरुन आला चाफा कुठूनी,
झाड ते आहे कसे?
खिल्ली उडवली जातसे,
संन्यस्त माझ्या वृत्तीची,
फांदी फांदी सांगेल का,
सत्यता आसक्तीची ?
गूढ ते माझ्याहीकरीता,
हे फुलांचे बहरणे,
जातो म्हणूनी निरोप घेता,
वाट कशी मग परतीची?
अपूर्ण....
(सौ. शैलजा शेवडे)
Comments