धन्वंतरीची प्रार्थना
धन्वंतरीची प्रार्थना.......
.
नमस्कार माझा धन्वंतरीला,
विष्णुस्वरुपा,सुदर्शनाला.|,
त्रैलोक्यनिधी, त्रैलोक्यस्वामी,
दयासागराला,नारायणाला |
.
अवतीर्ण झाले समुद्रामधूनी,
हातात अमृतकलशच घेऊनी,
निरोगी जगाया आयुर्वेद दिला,
नमस्कार माझा धन्वंतरीला |.
.
हातात शंख,चक्र,जलौका,
संजीवन तो,घट अमृताचा,
पितांबरधारी,सुलोचनाला,
नमस्कार माझा,धन्वंतरीला |
.
अपमृत्यू टाळी,जरा,व्याधी,हारी,
मागणे असे,हेच,हे चक्रधारी,
श्री श्री श्री औषधचक्र नारायणाला,
नमस्कार माझा धन्वंतरीला.|
.
सौ.शैलजा शेवडे
.
नमस्कार माझा धन्वंतरीला,
विष्णुस्वरुपा,सुदर्शनाला.|,
त्रैलोक्यनिधी, त्रैलोक्यस्वामी,
दयासागराला,नारायणाला |
.
अवतीर्ण झाले समुद्रामधूनी,
हातात अमृतकलशच घेऊनी,
निरोगी जगाया आयुर्वेद दिला,
नमस्कार माझा धन्वंतरीला |.
.
हातात शंख,चक्र,जलौका,
संजीवन तो,घट अमृताचा,
पितांबरधारी,सुलोचनाला,
नमस्कार माझा,धन्वंतरीला |
.
अपमृत्यू टाळी,जरा,व्याधी,हारी,
मागणे असे,हेच,हे चक्रधारी,
श्री श्री श्री औषधचक्र नारायणाला,
नमस्कार माझा धन्वंतरीला.|
.
सौ.शैलजा शेवडे
Comments