आनंदमय गणपती
संपून शब्द हे गेले , मौनात देह डोले,
एक तो, तोच चित्ती, आनंदमय गणपती..|
.
.
मूर्तीस न्याहळावे, हृदयात साठवावे,,
रुपात मोहिनी मोठी, आनंदमय गणपती |
.
.
ओंकार नाद घुमला , जाणीवा लुप्त झाल्या
स्पंदने अवती भवती ,आनंदमय गणपती |
.
.
श्रीवदनी ,शांत भाव, भ्रम भ्रांती नुरतो ठाव,
आधार लागतो हाती, आनंदमय गणपती |
.
.
दाविते सुंड, लय ताल, साकार आगळा डौल,
चैतन्य सृष्टी निर्मिती, आनंदमय गणपती |
.
.
प्रत्यक्ष तत्त्व आहे, एक तो नित्य आहे ,
साक्षात ज्ञानमूर्ती, आनंदमय गणपती |
.
..
.
(सौ. शैलजा शेवडे)
एक तो, तोच चित्ती, आनंदमय गणपती..|
.
.
मूर्तीस न्याहळावे, हृदयात साठवावे,,
रुपात मोहिनी मोठी, आनंदमय गणपती |
.
.
ओंकार नाद घुमला , जाणीवा लुप्त झाल्या
स्पंदने अवती भवती ,आनंदमय गणपती |
.
.
श्रीवदनी ,शांत भाव, भ्रम भ्रांती नुरतो ठाव,
आधार लागतो हाती, आनंदमय गणपती |
.
.
दाविते सुंड, लय ताल, साकार आगळा डौल,
चैतन्य सृष्टी निर्मिती, आनंदमय गणपती |
.
.
प्रत्यक्ष तत्त्व आहे, एक तो नित्य आहे ,
साक्षात ज्ञानमूर्ती, आनंदमय गणपती |
.
..
.
(सौ. शैलजा शेवडे)
Comments