रामचरित ते अतीव सुंदर महाकपि गाई
जय जय राम, जय श्रीराम, मर्यादापुरुषोत्तम राम,
शत्रुतापन राम राम, शीलसंपन्न ज्ञानी राम,
तेजस्वी सूर्यासम राम, विनीत वेदवेत्ता राम,
जीवलोक रक्षक राम, धर्मरक्षक योद्धा राम |
.
श्रीराम जय राम जय जय राम, नाद मधुर येई.
रामचरित ते अतीव सुंदर, महाकपी गाई |
.
अशोकवनी ती दुःखी सीता, स्वर सुंदर ऐकते,
आनंदीत, तरीही क्षणात फिरुनी शंकीतही होते |
.
कोण करीतसे या भूमीवर,कर्णमधुर ते मंजुळ गायन,
जयघोष तो प्रिय रामाचा, सत्य असे कि स्वप्न विलक्षण |
.
झाडावरून उतरी मारुती, तिच्यापुढे येई,
रामनामे मुद्रा अंकित, सीतेला देई |
.
'श्रीरामाच्या आज्ञेने मी, आज इथे आलो,
जनककन्यके,, कुशल जाणण्या, रामदूत बनलो |
.
हे देवी, तुझ्या वियोगे, शोकमग्न श्रीराम,
क्षणभरही तो मनास त्यांच्या नाही नाही आराम |
.
शोधित तुजला दुःखी मनाने, फिरले रानीवनी
वानरसेनेसवे सुग्रीव मित्र मग मदतीस ये धावुनी |
.
दक्षिणेकडे तुला शोधण्या, यशस्वी मी झालो,
उल्लंघून ते पर्वत, सागर, आज इथे आलो |
.
आता जाणतील, तुझा ठिकाणा, त्वरीत ते येतील,
लंकेशाचा वध करुनिया, तुला इथून नेतील |
.
नकोच शंका मनी कोणती , येतील येतील राम,
धैर्य धरुनिया वाट पहा तू, येतील येतील राम |
.
(सौ. शैलजा शेवडे)

Comments