शरशय्येवर भीष्म पितामह,
शरशय्येवर भीष्म पितामह..
.
भीष्माचार्य ...अत्यंत पराक्रमी परम ज्ञानी भक्त....
मला त्यांच्यामधली कृष्णभक्ती भावली. श्रीकृष्णाशी त्याचे भक्त कसा संवाद साधत असतील, त्याची कशी प्रार्थना करत असतील, ही एक उत्सुकता. त्यासाठी मी वृंदावनातली गोपी झाले..कधी देवकी झाले..कधी रुक्मिणी झाले..कधी कुब्जा झाले..त्यांच्या भावना शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला. पण भीष्माचार्यांसारखे परम ज्ञानी भक्त कृष्णाला नेमक्या कुठल्या स्वरूपात बघत असतील, कुठले रुप आठवत असतील, प्रार्थना करतांना त्यांचे शब्द काय असतील, याचा अंदाज येत नव्हता. पण सुदैवाने भीष्मस्तुती म्हणून संस्कृतमधली भीष्माचार्यांची प्रार्थना आली. मी त्याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनाला ते शब्द ती भावना भिडली. ही कविता म्हणून फारशी जमली नसेल, यमक, वृत्त या नियमात नसेलही. त्यामुळे एक स्वतंत्र कविता म्हणून याकडे बघू नका. भीष्माचार्यांना जाणण्याचा प्रयत्न...!
.
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश केला. उत्तरायण सुरू झाले. त्यांनी
आपले मरण जाणले. समोर उभ्या असलेल्या श्रीकष्णावर नजर खिळवली. आणि त्याची प्रार्थना सुरू केली. ही प्रार्थना मी माझ्या शब्दात लिहितेयं.
.
भीष्मस्तवराज .. (मराठी काव्यानुवाद )
.
शरशय्येवर भीष्म पितामह,
निरखती निरखती देवकीनंदन,
विजितात्मा ते विमुक्त होऊन,
प्रसन्नतेने प्रार्थती स्तवन ।

’रूप सावळे, त्रिभुवनसुंदर,
कुंतल कुरळे, मुखकमलावर,
पार्थसख्या, श्रीकृष्णजनार्दन,
ठायी तुझ्या मम भक्ती समर्पण ।
.
युध्दी, वदन धुळ माखल्या,
घर्मबिंदु केसात अडकल्या,
मम बाणांचे कवच वेढल्या,
श्रीकृष्णा त्या चित्त समर्पण ।
.
पार्थवचने, युध्दभूमीवर
रथ नेऊनी तत्काळ मधोमध
दृष्टीने रिपु आयु हरण,
श्रीकृष्णा त्या वृत्ती समर्पण ।
.
आप्तवध तो अधर्म समजून,
युध्द नकोशा पार्था जाणून,
आत्मविद्या करिती कथन,
परमपुरुषा, प्रीती समर्पण ।
.
मम प्रतिज्ञा सत्य कराया,
स्वप्रतिज्ञा मोडून आले,
हाती चक्र, भूमी डळमळे,
वधण्या हत्ती सिंह जणू चाले ।
.
आततायी मी शरवर्षावे,
जखमी केले कवच भेदून,
वधावया मज येती धावून,
तया मुकुंदा गती समर्पण ।
.
विजयरथस्थित बघता श्रीमुख,
वीर पावले, मुक्ती सरूप,
इच्छामरणी मम अंतकाळी,
श्रीकृष्णा परमप्रीती समर्पण ।
.
गोपी गौरवसी, प्रेमे बोलून,
गर्वही हरसी विरह देऊन,
अनुसरती तव लीला मोहन,.
श्रीकृष्णा तुज, वृत्ती समर्पण ।
.
राजसूय यज्ञात दाखवी,
अद्भूत ते विराट दर्शन,
पुजती तुजला नृपवर मुनिगण,
हे विश्वात्म्या, चित्त समर्पण ।
.
अनंतरूपे, एक अजन्म,
सर्वांहृदयी एक जनार्दन,
भेदरहित मी सारे जाणून,
परमात्म्या, तुज प्राण समर्पण ।
.
.
( सौ. शैलजा शेवडे )
कुंतल कुरळे, मुखकमलावर,
पार्थसख्या, श्रीकृष्णजनार्दन,
ठायी तुझ्या मम भक्ती समर्पण ।
.
युध्दी, वदन धुळ माखल्या,
घर्मबिंदु केसात अडकल्या,
मम बाणांचे कवच वेढल्या,
श्रीकृष्णा त्या चित्त समर्पण ।
.
पार्थवचने, युध्दभूमीवर
रथ नेऊनी तत्काळ मधोमध
दृष्टीने रिपु आयु हरण,
श्रीकृष्णा त्या वृत्ती समर्पण ।
.
आप्तवध तो अधर्म समजून,
युध्द नकोशा पार्था जाणून,
आत्मविद्या करिती कथन,
परमपुरुषा, प्रीती समर्पण ।
.
मम प्रतिज्ञा सत्य कराया,
स्वप्रतिज्ञा मोडून आले,
हाती चक्र, भूमी डळमळे,
वधण्या हत्ती सिंह जणू चाले ।
.
आततायी मी शरवर्षावे,
जखमी केले कवच भेदून,
वधावया मज येती धावून,
तया मुकुंदा गती समर्पण ।
.
विजयरथस्थित बघता श्रीमुख,
वीर पावले, मुक्ती सरूप,
इच्छामरणी मम अंतकाळी,
श्रीकृष्णा परमप्रीती समर्पण ।
.
गोपी गौरवसी, प्रेमे बोलून,
गर्वही हरसी विरह देऊन,
अनुसरती तव लीला मोहन,.
श्रीकृष्णा तुज, वृत्ती समर्पण ।
.
राजसूय यज्ञात दाखवी,
अद्भूत ते विराट दर्शन,
पुजती तुजला नृपवर मुनिगण,
हे विश्वात्म्या, चित्त समर्पण ।
.
अनंतरूपे, एक अजन्म,
सर्वांहृदयी एक जनार्दन,
भेदरहित मी सारे जाणून,
परमात्म्या, तुज प्राण समर्पण ।
.
.
( सौ. शैलजा शेवडे )
Comments