निवडुंगामध्ये पदर अडकला

ओरखड्यांची कथा अशी ही,

कसा कुठे अन जीव गुंतला,

मुक्त मनाने चालत असता,

निवडुंगामध्ये पदर अडकला।

अंगावरती काटे घेऊनी,

तो‍र्‍यामध्ये उभाच होता,

असा कसा अन वारा सुटला,

निवडुंगामध्ये पदर अडकला ।

किती मग त्या जखमा झाल्या,

कथा किती अन त्याच्या झाल्या,

पापण्यात मग अश्रुही थिजला,

निवडुंगामध्ये पदर अडकला ।

बेफिकीर तो तसाच आहे,

रस्ता माझा कुठला आहे?

काळजातही काटा रुतला,

निवडुंगामध्ये पदर अडकला ।

- सौ शैलजा शेवडे

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?