पाठमोरा

पाठमोरा *


तू पाठमोराच रहा,वळू नकोस!

मला भीती वाटते,

तू तो नसशील तर...!

कबुल आहे,मी तुझ्यामागे धावतेय,

कबुल आहे,मी तुझ्यासाठी रडतेयं,

कबुल आहे,मी त्रागा करतेयं,

माझ्या हाका तू ऐकत नाहीस म्हणून!

आपल्यातलं अंतर कमी होत नाही म्हणून!

पण जर तू थांबलास...,वळलास...,

आणि माझ्या लक्षात आलं,

तू तो नाहीस म्हणून.....

दुसराच कुणीतरी आहेस म्हणून,

तर.... मी मोडून पडेन,

सत्य स्वीकारायची ताकद नाही आता,

म्हणून म्हणते,पाठमोराच रहा....,

मी हाका मारत राहीन....!



कवयित्री - श्रीमती शैलजा शेवडे

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?