तारकांनो, सांगता का..

चांदण्यांची स्पंदने ही, श्वास का भासे तयाचा,
रात्रीच्या या शांत वेळी, खेळ तो चाले मनाचा ।

प्रश्न जो छळतो कधीचा, कोण सांगे उत्तराला,
साधणे ते काय आहे, शोध तो आहे कुणाचा?

तारकांनो, सांगता का, ठाव त्या परमेश्वराचा,
आखुनी जो मार्ग देतो, अंतराळी चालण्याचा ।

उत्तरेला ध्यान योगी, दृढ दावीतो, दिशेला,
तो नियंता कोण आहे, ध्रुव तारा भक्त त्याचा ।

आदि नाही, अंत नाही, निर्मिती हुंकार आहे,
पाहिले त्याला कधी का, सर्वकाळी, संग ज्याचा ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?