दिलवरा, घमघमला मोगरा ।
रामरगाडा रोजचाच हो,
बघा इथंही जरा,
दिलवरा, घमघमला मोगरा, दिलवरा, घमघमला मोगरा
कोकीळ घाली साद प्रियेला,
शृंगाराचा वखत की आला,
चोचीमन्दी चोच घालीता, उधाण ये कबुतरां,
दिलवरा घमघमला मोगरा ।
अहा उमलली कालची कळी,
चावट भुंगा, घिरट्या घाली,
का शिरशिरी, अंगांगावरी, ओढ किती अंतरा,
दिलवरा, घमघमला मोगरा ।
का हो राजसा, दूर राहता,
समजून उमजून उगा हासता,
मिठीत घेऊनी, हुंगून घ्या हो, टवटवीत गजरा,
दिलवरा घमघमला मोगरा ।
(सौ. शैलजा शेवडे)
बघा इथंही जरा,
दिलवरा, घमघमला मोगरा, दिलवरा, घमघमला मोगरा
कोकीळ घाली साद प्रियेला,
शृंगाराचा वखत की आला,
चोचीमन्दी चोच घालीता, उधाण ये कबुतरां,
दिलवरा घमघमला मोगरा ।
अहा उमलली कालची कळी,
चावट भुंगा, घिरट्या घाली,
का शिरशिरी, अंगांगावरी, ओढ किती अंतरा,
दिलवरा, घमघमला मोगरा ।
का हो राजसा, दूर राहता,
समजून उमजून उगा हासता,
मिठीत घेऊनी, हुंगून घ्या हो, टवटवीत गजरा,
दिलवरा घमघमला मोगरा ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments