खेळ वाटे हाच सारा ।

खेचतो, वेगे जरी तो, मोहमायेचा पसारा,
जिंकण्याची जिद्द आहे, खेळ वाटे हाच सारा ।

दुर्गुंणांनी व्यापलेला, देह हा आहे जरीही,
पापपुण्याची गणिते, तो विवेकाचा पहारा ।

रोज चाले युध्द माझ्या, अंतरंगी जे अनोखे,
क्रोध जिंके वाटते तो, शांततेचा होय नारा ।

सोंग घ्यावे, जाणत्याचे, सर्वसाक्षी पाहणारा
लज्जिते, स्वीकारते मी, युध्दभूमीचा पुकारा।

ना मुळी सोप्पे तरीही, पेलते आव्हान मीही,
हारतांना घोकते तो, जिंकण्याचा मंत्र न्यारा ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?