जाणून घे तूचि तुझा, हे गजानना..
तगमग किती अंतरात, सांगू मी कुणा,
जाणून घे तूचि तुझा, हे गजानना.......!
उधळल्या वारूची, अफाट ही गती,
लगाम हा खेचण्यास, तोकडी मती,
असहाय मी, अगतिक मी, मार्ग दाव ना,
जाणून घे तूचि तुझा, हे गजानना.........!
कळते, पण वळत नाही,
रुतते, पण तुटत नाही,
अहंकार हा कसा काढतो फणा,
जाणून घे, तूच तुझा, हे गजानना..!
मी, माझे, माझ्याचसाठी,
गुंतता रेशीमगाठी,
आक्रसले वसन अन मोडला कणा,
जाणून घे, तूची तुझा, हे गजानना...!
(सौ. शैलजा शेवडे)
जाणून घे तूचि तुझा, हे गजानना.......!
उधळल्या वारूची, अफाट ही गती,
लगाम हा खेचण्यास, तोकडी मती,
असहाय मी, अगतिक मी, मार्ग दाव ना,
जाणून घे तूचि तुझा, हे गजानना.........!
कळते, पण वळत नाही,
रुतते, पण तुटत नाही,
अहंकार हा कसा काढतो फणा,
जाणून घे, तूच तुझा, हे गजानना..!
मी, माझे, माझ्याचसाठी,
गुंतता रेशीमगाठी,
आक्रसले वसन अन मोडला कणा,
जाणून घे, तूची तुझा, हे गजानना...!
(सौ. शैलजा शेवडे)
Comments