नंद सांगे उध्दवाला,
नंद सांगे उध्दवाला, एक एक कृष्णलीला,
आठवांनी सावळ्याच्या, वाहताती अश्रुमाला..।
कौतुके ऐके यशोदा, वात्सल्याने ऊर भरला,
वाहले ते स्तन्य, आणि पदर ओलाचिंब झाला..।
'सांग रे स्मरण करतो, उध्दवा कान्हा आम्हाला ?
गोपगोपी, वासरांना, आणि या वृंदावनाला?
रक्षिले त्यानेच आम्हां, आली जरी संकटे कितीही,
कालिया, घनघोर वर्षा, आणि भीषण वादळेही ।
आठविता मधूर त्याचे, बोलणे अन हासणे,
हरवून जातो रे स्वतःला, राहती अन सर्व कामे..।
ही यमुना, वृंदावन, बागडला जिथे कृष्ण,
इथे कृष्ण, तिथे कृष्ण, मनोमनी कृष्ण कृष्ण..।
काय वर्णू उध्दवा, पराक्रमी त्या बालकाला?
सहज मारीले कसे, कंस चाणूर, मुष्टीकाला...।
तो कुवलयापीड हत्ती, किती सहजच मारीला,
सात दिवस गोवrdhaन, होता उचलूनीया धरीला..।
प्रलंब, धेनूक बक अरिष्ट, तृणावर्त, असूर सारे,
देवांनाही अजिंक्य होते, वधिले, कृष्णानेच सारे..।
सांग उध्दवा, तो मनमोहन, येईल का एकदातरी,
ते सुस्मित, सुंदर मुख, दिसेल का एकदातरी?' ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments