गेला दिन गेला
गेला दिन गेला,
वाट ना सरली,
फुले कोमेजली,
झाडावरी ।
सोनेरी किरणे,
कुठे हरविली,
चोरुनीया नेली,
अंधाराने ।
जंगलाची वाट,
अनोळखी भीती,
वाकुल्या दाविती,
सावल्याही ।
माझे माझे सारे,
सगेसोयरे ते,
शोधीत फिरते,
सापडेना ।
रातराणी रानी
लागे दरवळू,
वाटे परिमळू,
सावळ्याचा ।
कोणी हे धरले,
अलगद बोट,
चालतांना वाट,
तेजाळली ।
(सौ. शैलजा शेवडे)
वाट ना सरली,
फुले कोमेजली,
झाडावरी ।
सोनेरी किरणे,
कुठे हरविली,
चोरुनीया नेली,
अंधाराने ।
जंगलाची वाट,
अनोळखी भीती,
वाकुल्या दाविती,
सावल्याही ।
माझे माझे सारे,
सगेसोयरे ते,
शोधीत फिरते,
सापडेना ।
रातराणी रानी
लागे दरवळू,
वाटे परिमळू,
सावळ्याचा ।
कोणी हे धरले,
अलगद बोट,
चालतांना वाट,
तेजाळली ।
(सौ. शैलजा शेवडे)
Comments