टपटप टपटप, दा दिर दारा,

टपटप टपटप, दा दिर दारा,
सूर झेलू या, या जलधारा,
उधाण वारा, नदी किनारा,
खुणावतो तो, करी इशारा,
दा दिर दारा, दा दिर दारा!

सूर बरसती, दिरदिर दिरदिर,
थेंब टपोरे, पडती झिरमिर,
आज मोकळे नाचू, थिरथिर,
चिंब भिजू या, हात या धरा,
दा दिर दारा, दा दिर दारा!

भान विसरूनी, ताल धरूनी,
गाणे जुळवू, सारे मिळूनी,
दाटून आलेल्या अंधारा,
पळवी, ऐसा शोधू तारा,
दा दिर दारा, दा दिर दारा ।

(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?