सूर ते तुझ्या वीणेचे
सूर ते, तुझ्या वीणेचे, शब्द होऊन नाचले,
आज मी, माझ्या मनाला, थक्क होऊन वाचले |
आज मी, माझ्या मनाला, थक्क होऊन वाचले |
.
.
ती सुरावट, फिरत ती, मींड ती, लयकारी ती,
ते अनोखे शब्दचित्रच , थक्क होऊन वाचले |
.
ती सुरावट, फिरत ती, मींड ती, लयकारी ती,
ते अनोखे शब्दचित्रच , थक्क होऊन वाचले |
.
.
एक अनवट राग होता, सूर जे झंकारले,
उमटले आलेख मनी ते, थक्क होऊन वाचले |
.
एक अनवट राग होता, सूर जे झंकारले,
उमटले आलेख मनी ते, थक्क होऊन वाचले |
.
.
गूढ ती थरथर शरीरी, श्वास वेगे चालले,
कोणते ते वृत्त होते, थक्क होऊन वाचले |
.
गूढ ती थरथर शरीरी, श्वास वेगे चालले,
कोणते ते वृत्त होते, थक्क होऊन वाचले |
.
.
लाट वेगे खेचुनी ने, दाविले संकेत काही,
अर्थ त्यातून जे निघाले , थक्क होऊन वाचले |
.
लाट वेगे खेचुनी ने, दाविले संकेत काही,
अर्थ त्यातून जे निघाले , थक्क होऊन वाचले |
.
.
.
.
.
( सौ. शैलजा शेवडे )
Comments