अहल्योद्धार
अहल्या उद्धार
.
केवळ वायुभक्षण करुनी, भस्मशायिनी होती,
आश्रमात ती पतीच्या शापे, अदृश्या होती |
.
वर्षामागून वर्षे गेली, उद्धाराचे क्षण आले,
राम लक्ष्मण विश्वामित्र आश्रमात ठाकले |
.
तपश्चर्येने चारी दिशांना प्रभा जिची फाकली,
देवांनाही दर्शन दुर्घट अहल्या देखिली |
.
ब्रह्मदेवे, महाप्रयत्ने जणु माया दिव्य निर्मिली,
प्रदिप्त अग्निज्वाला जणु ती धूमाने व्यापली |
.
उज्ज्वल सूर्यप्रभा जणु ती, मेघातली भासली,
अभ्रयुक्त तुषारव्याप्त, प्रभा चंद्राची वाटली |
.
राघवांनी हर्षाने तिच्या चरणांना स्पर्शिले,
गौतममुनींनी अहल्येसह रामाचे पूजनही केले |
.
रोमहर्षक हा प्रसंग मोठा, देवही ते हर्षले,
तपोबलाने शुद्ध जाहल्या अहल्येस गौरविले |
.
दशरथपुत्र रामकृपेने ती शापमुक्त झाली,
पूर्ववत तो देह मिळाला, अहल्या उद्धरली |
.
.
(सौ शैलजा शेवडे)

Comments