मायापंचकं अनुवाद

निरुपम नित्य अखंडित निर्गुण,
विकल्परहीतच असता आत्मा,
घडवत भेदा जीव जगदिशा,
अघटित घडवी, कुशलच माया |
.
विद्वान वेद शास्त्रा पढती,
द्रव्यलालसे भ्रष्टते मती,
पशुसम बनवी जी विद्वाना,
अघटित घडवी, कुशलच माया |
.
सच्चिदानंद अखंड आत्मा,
तनपिंज-यात कोंडी त्याला,
भ्रमवित आणि ,भवसागरी या,
अघटित घडवी, कुशलच माया |
.
गुणवर्णविहित असता आत्मा,
विप्र ,वैश्य मी , भेद आणला,
भुलवत मग , पुत्र नि जाया,
अघटित घडवी, कुशलच माया |
.
हरिहरभेद आणी अखंडी,
भल्याभल्यांना सहजी चकवी,
हरि की हर तो? भ्रमवी सकला,
अघटित घडवी, कुशलच माया |
.
अनुवाद: सौ. शैलजा शेवडे 

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?