अंतरातली सतार
अंतरातली सतार, छेड आज एकवार,
ताल तोच,सूर तेच, तोच तूच जादुगार ।
.
सांज ही असे उदास, का पुन्हा तुझेच भास,
काळजात गुंजतोच, कानडा तुझाच ध्यास,
काळ वाटतो असार, दे सख्या, सुखा उधार,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार ।
.
वादळात एक दीप,आज ही तशी तिरीप ,
का खुळ्या मनास भास, दूर तू, तरी समीप ,
पापणीस अश्रुभार , जीव गुंतला अपार ,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार |
.
पावसात चिंब गात, दूर पाखरू अशांत,
पान पान संभ्रमात, नाद हा खुळाच ज्ञात,
काळजात गूढ वार, कोण तो मनी सवार,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार,
.
मोगरा फुले तसाच , जाणता अजाणताच,
कंप कंप तो फुलात , गंधबाव-या मनात ,
खेचलीस तार तार, पापण्यात ये किनार,
ताल तोच,सूर तेच, तोच तूच जादुगार |
.
कोंडले कितीक श्वास, आत आत तोच न्यास,,
तेच भास रे मनास, आस तीच काळजास,,
मोजते,क्षणां अपार , बंद का तुझेच द्वार,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार |
.
.
(सौ. शैलजा शेवडे )
.
ताल तोच,सूर तेच, तोच तूच जादुगार ।
.
सांज ही असे उदास, का पुन्हा तुझेच भास,
काळजात गुंजतोच, कानडा तुझाच ध्यास,
काळ वाटतो असार, दे सख्या, सुखा उधार,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार ।
.
वादळात एक दीप,आज ही तशी तिरीप ,
का खुळ्या मनास भास, दूर तू, तरी समीप ,
पापणीस अश्रुभार , जीव गुंतला अपार ,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार |
.
पावसात चिंब गात, दूर पाखरू अशांत,
पान पान संभ्रमात, नाद हा खुळाच ज्ञात,
काळजात गूढ वार, कोण तो मनी सवार,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार,
.
मोगरा फुले तसाच , जाणता अजाणताच,
कंप कंप तो फुलात , गंधबाव-या मनात ,
खेचलीस तार तार, पापण्यात ये किनार,
ताल तोच,सूर तेच, तोच तूच जादुगार |
.
कोंडले कितीक श्वास, आत आत तोच न्यास,,
तेच भास रे मनास, आस तीच काळजास,,
मोजते,क्षणां अपार , बंद का तुझेच द्वार,
ताल तोच, सूर तेच, तोच तूच जादुगार |
.
.
(सौ. शैलजा शेवडे )
.
Comments