काय त्याचे नाव आहे?
तार्किकांनो, वाद का हा, काय त्याचे नाव आहे,
विश्व जेणे निर्मिले हे, काय त्याचे नाव आहे?
काय त्या आकार आहे? कोण त्याला जन्म देतो?
राहतो कोठे, कसा तो? कोणते ते गाव आहे?
...

तार्किकांनो, बोलतांना, का असा उपहास येई,
ज्ञान नाही, मज जराही, भाबडा पण भाव आहे ।
अंतरीही वास ज्याचा, श्वास माझा शोध घेई,
मूर्त त्याची मार्ग देई, पोचण्याला वाव आहे ।
तो मना आनंद मिळतो, शांतचित्ते पूजिण्याला,
जाणण्याला निर्गुणाला, ही अनोखी धाव आहे ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments