माणसे माझीच होती...

कोण बोले शापवाणी, धार डोळा लागली,
का फुलांना वेचतांना, ठेच पायी लागली ।

वाट होती रंगलेली, धुंदलेली यामिनी,
घोकता पाढे सुखाचे, जीभ कोणी डागली?


मध्यकाळी गुप्त होती, सांज होता लांबली,
सावली वेड्यापरी ती, धावतांना भागली ।


देव ते प्रार्थू कशाला, मी स्वतःला पूजिले,
चूक केलेली कधिची, थक्क होऊन जागली ।


ठोकताळे बांधलेले, मेळ झाला ना कधी,
माणसे माझीच होती, का अशी ती वागली ?




(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?