मन चंचल वारू जणु..

कळते, पण वळत नाही, खंत किती वाटते,
मन चंचल वारू जणु, वा-यागत धावते ।


इथे अता खिदळते, खुळे खुळे उधळते,
अलगद तरी निसटते, दूर कुठे भरकटते
...
जगत असे, तो क्षण मी, जगण्यास्तव मागते,
परि मन ओलांडून काळ, झुलत झुलत राहते ।


अवखळ ते अचपळ मन, स्वैर स्वैर का पळते
लगाम त्यास शोधू कुठून, सारथी बनू पाहते ।


थांब थांब रे मना, सूखनिधान या इथे,
राम नाम जप जरा, अजून ध्येय कोणते?


(सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?