मंदहास्ये ये प्रसन्ने,
कनकधारा कमलिनी, हे भार्गवी राजेश्वरी,
विष्णुपत्नी लक्ष्मी हे, पद्ममालिनी सुंदरी,
स्वागता तव दीपमाळा, अंगणी अन अंतरी,
मंदहास्ये ये प्रसन्ने, पद्मिनी हे ईश्वरी ।
हे सुवर्णे माधवी, बघ रेखिली रंगावली,
हेममालिनी येई सदनी, सोनियाच्या पावली ।
उजळले घरदार हे, श्रीरंगधामेश्वरी,
मंदहास्ये ये प्रसन्ने, पद्मिनी हे ईश्वरी ।
पद्मजे, हे मोहिनी, स्वीकार पूजा अर्चना,
वैष्णवी हे भार्गवी, दे आशिष सा-या जना,
दैन्य सारे दूर जावो, सौख्य ते नांदो घरी,
मंदहास्ये ये प्रसन्ने, पद्मिनी हे ईश्वरी ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments