जगण्यासाठी नवे बहाणे...
जगण्यासाठी नवे बहाणे, शोध रे मना, निःशंक..!
हसण्यासाठी, नवे बहाणे, शोध रे मना, निःशंक...!
गाण्यासाठी, नवे बहाणे , शोध रे मना, निःशंक...!
गा..गा..गा, तू तुझ्याचसाठी, आनंदाने, निःशंक...!
चैत्रपालवी, कोकीळासवे, तू ही मोकळे, गा गा गा..
रणरणत्या वैशाखी, फुलतो, गुलमोहर, तू गा गा गा..
पाऊसवेडा, पक्षी होऊनी, आषाढातही, गा गा गा..
हुडहुडी भरली, माघाचीही, उडवून टाकत गा गा गा..!
आनंदाने मन भरले, तर घे खुशाल रे तू गिरकी,
नवीन काही सुचले तर मग, घे खुशाल रे तू गिरकी,
उडून जावो पाचोळाही, घे खुशाल रे तू गिरकी,
मजा वाटू दे लोकांनाही, घे खुशाल रे, तू गिरकी ।
दोन क्षणांचे जीवन समजून, देई ताल तो धा धिं धीं,
हवा कशाला तबला डग्गा, मनी ताल तो धा धिं धीं,
मनात रुजले गोड काहीसे, तोच ताल तो धा धिं धीं,
भग्न जाहले, हृदय तरी तो राम पाठीशी धा धिं धीं ।
(सौ. शैलजा शेवडे)

Comments