जाता जाता..
जीवनवीणा सुरात गावी जाता जाता,
आनंदाची लूट करावी जाता जाता ।
कधी न सुचली लकेर यावी सहजच ओठी ।
मुक्त मनाने रिक्त करावी जाता जाता ।
कसा गुंतला जीव कुणावर कोडे वाटे,
निरगाठींची उकलच व्हावी जाता जाता ।
किती राग, ते हेवेदावे, ती भवचिंता,
कर्पूर होऊन जळून जावी जाता जाता ।
ध्यास जीवाला, भास कधीचा, त्या अरुपाचा,
शामलसुंदर मूर्त दिसावी जाता जाता ।
(सौ शैलजा शेवडे)
आनंदाची लूट करावी जाता जाता ।
कधी न सुचली लकेर यावी सहजच ओठी ।
मुक्त मनाने रिक्त करावी जाता जाता ।
कसा गुंतला जीव कुणावर कोडे वाटे,
निरगाठींची उकलच व्हावी जाता जाता ।
किती राग, ते हेवेदावे, ती भवचिंता,
कर्पूर होऊन जळून जावी जाता जाता ।
ध्यास जीवाला, भास कधीचा, त्या अरुपाचा,
शामलसुंदर मूर्त दिसावी जाता जाता ।
(सौ शैलजा शेवडे)
Comments