कठोपनिषद.. भाग एक
कठोपनिषद.. भाग एक
मी नचिकेत बालक, आपण यमधर्म महान,
उत्सुक आहे, सत्य जाणण्या, स्वीकारा प्रणाम,
नको मला ती ऐहिक सुखे, नको अन्य वरदान,
प्रभो मज द्या मृत्युचे ज्ञान, प्रभो मज द्या मृत्युचे ज्ञान ।
जेव्हा कोणी माणूस मरतो, संदेहच मग मनात येतो,
कोणी म्हणतो, संपून जातो, कोणी म्हणतो, तरीही असतो,
काय सत्य ते, तुम्हीच सांगा, द्या मज आत्मज्ञान,

कठीण म्हणता विषय जरी हा, मला सांगण्या दुजा कुणी ना,
नको मला ते शतायुष्य अन, पुत्रपौत्र सन्मान,

कशास मागू दुर्लभ सुखे, अनित्य असती मला ठाऊके,
शाश्वताचीच तळमळ हृदया, नको नृत्य गीत गान,

जरी हे माझे, शरीर सुकले, अस्थिपंजर बनून उरले,
तरी बोधाविण, त्या, बहुकल्पी दुर्लभ, नाही नाही प्रस्थान,

(सौ. शैलजा शेवडे)

Comments